अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या समाधीचे ठिकाणी आलेले स्वलेखन


अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या पादुकांसमोर झालेले स्वलेखन



 स्वलेखन म्हणजे काय? ते कसे करतात? ते कोण करते? वगैरे माहितीसाठी वरील लिंक उघडा.

ऑटोरायटींगची सुरवात कशी दणक्यात झाली याची ही कहाणी! 
"भडव्या  भुत बघायची घाई तुला. तिथ येशील तेंव्हा भेट मला. पोरगी म्हणाली म्हणून तू आला(स) पुन्हा येईन म्हणून गेला(स) गडबडीत... भेटायला येता मतीप्रकाश होईल.... 
कुत्र्याला पावाचा तुकडा दे.
... समर्थ..." 
समाधी समोरच्या लोखंडी सळ्यांच्या सोप्यात वरील ऑटोरायटींग घडले. त्याचा संदर्भ सांगणे गरजेचे आहे...
त्याचे असे झाले... 
... २५ फेब्रुवारी २०२१ रोजी गाडी करून आम्ही अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या समाधीचे दर्शन घ्यायला गेलो होतो. वाटेत तसेच पुढे जाऊन गाणगापूरला नृसिंह पादुकांचे दर्शन घ्यायला जायचे ठरवले होते. 
पराग (जावई), नेहा, व चिन्मय मुलांना तिथे अंगात आलेल्या व्यक्ती दिसतात असे बोललो होतो. म्हणून त्यांना तेही पहायला जायची सुरसुरी होती. ती संधी मिळेल असे वाटत होते. पण कर्नाटक राज्यातील कोरोनाच्या बिकट परिस्थितीमुळे राज्यात बंदी घातली होती म्हणून आमचे तिथे जाणे रद्द झाले होते. या संदर्भात पहिले वाक्य चपखल होते... 
स्वामींच्या तोंडी अशी कडक, शिवराळ भाषा असे. ते मी पोथीतील वाचनातून जाणून होतो. मलाही त्याचा 'प्रसाद' ऑटोरायटींगमधून मिळाला. यावरून लेखन हे स्वामींच्याच व्यक्तिमत्त्वाचे आले होते! .... 
... “परत येतो म्हणालास अन गडबडीत गेलास“ ... 
तो संदर्भ ही अगदी बरोबर आहे. कसा तो पहा... 
... ४ वर्षांपूर्वी मी एकटाच अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या समाधीचे दर्शनासाठी गेलो होतो. तेंव्हा मी रिक्षा ठरवून मंदिराबाहेर उभी केली होती. तिथल्या काही अन्य धार्मिक स्थळांचे दर्शन घेऊन परत जावे असा विचार होता. मात्र मला स्वामींच्या पादुकांचे समोर बसल्यावर ऑटोरायटींगचा उद्भवले व वेळ गेला. रिक्षाचालक मला चला लौकर नाही तर ३ वाजताची शेवटची पुण्यास जाणारी बस चुकेल म्हणून तगादा करत होता. (तेंव्हा मी सावकाश दर्शनासाठी पुन्हा येईन असे म्हणून गेलो असेन, जे मध्यंतरीच्या काळात मी विसरलो होतो) ... त्या संदर्भात मी पुन्हा एकदा इथे सावकाशीने येईन म्हटल्याप्रमाणे मला नंतर आठवत नाही, विसरायला झाले आहे. ते नेमके या वाक्यातून मला जाणीव करून देण्यासाठी आले...
 
... "तिथे (गाणगापूरला) येशील तेव्हा भेट (घडवीन?) किंवा माझे त्या रूपात दर्शन होईल" ... 
याचा संबंध असा 
... मुलगी नेहाने पुढाकार घेऊन ही यात्रा ठरवली, सर्व खर्च तिनेच केला. ती म्हणाली म्हणून ती त्यांची साथ केली. (तू आपणहून आलेला नव्हतास!)
... "कुत्र्याला पावाचा तुकडा दे..." 
ह्या वाक्याचा संदर्भ मला वाटतो की खूप वर्षांपूर्वी तिरुवन्नमलाईच्या अरुणगिरी पर्वताची पायी प्रदक्षिणा घालत होतो तेव्हा एका मागे मागे येणाऱ्या कुत्र्याला बिस्किटे खायला द्या असे म्हटले गेले. नंतर खुलासा झाला की ते शुक महर्षी आशीर्वाद देण्यासाठी आले होते! इथे स्वामींनी कुत्र्याला पावाचा तुकडा दे म्हणजे दत्त संप्रदायातील संत, महंत, स्वामींच्या आशीर्वादाचा तू अधिकारी होशील. अशा आहे...
...“मला `मतीप्रकाश` होईल, जेव्हा मी पुन्हा भेटायला जाईन हे भविष्यकाळातील स्वामी समर्थांनी वचन दिले आहे...!
“समर्थ“ असे मोबाईलवरून ऑटोरायटींग नोंदवले गेले तरी कागदावर लिहून झाल्यावर साधारणपणे एक आशीर्वादात्मक हस्त मुद्रा येते व नंतर  लेखन कोण करत आहे याचा संदर्भ लागतो. इथे तसे चित्र काढले गेले नव्हते.

Comments

Popular Posts