ऑटो रायटिंग अर्थात संचार लेखन

 ऑटो रायटिंग अर्थात संचार लेखन

| "ऑटोमॅटिक किंवा ऑटो रायटिंग ज्याला मराठीत संचार लेखन असे नाव आहे. ही एक गूढविद्येतील संज्ञा आहे. त्यामधे संचार झालेला व्यक्ती मृतात्म्याशी संपर्क साधून त्या मृतात्म्याच्या विचारांचे लेखन (Writing) आपल्या शरीराचे माध्यम करुन उत्स्फूर्तपणे (Automatically) करतो,

मेहेर बाबांसारख्या शुभ आत्म्यांना ऑटो रायटिंगची प्रेरणा देण्याचे कार्य माझ्या हातून घडावे असे वाटल्याने, वडिलांच्या आशीर्वादाने हा लेख ग्रहांकित सारख्या प्रतिष्ठित दिपावली अंकात प्रस्तुत होत आहे. योग्य वेळ येताच ऑटो रायटिंगवर ह्म लेरव 5 वर्षांच्या कालावधी नंतर प्रकाशित होण्यामागे ऑटो रायटिंग करायासाठी इच्छुकांना दीक्षा देण्याची माझी पात्रता निर्माण होणे हे कारण असावे”


प्रस्तावना


मानव ही अशी एक अजब यंत्रणा निसर्गाने निर्माण करून ठेवली आहे की त्या यंत्रणेद्धारे कोणत्याही गोष्टी साध्य करता येतील. दिव्यश्रवण (Clairaudience), दिव्यदर्शन (Clairvoyance), परचित्त आकलन (Telepathy) या सर्व किमयांचे उगमस्थान मानवी शरीर आहे. या अजब यंत्रणेसमोर आधुनिक युगातील यंत्रसामुग्री तोकडी ठरते. सामान्यतः मानवी बुद्धीला ज्ञात फुटपट्या किंवा तर्क या अत्यंत तरल किंवा दिव्य मानवी यंत्रणेचे आकलन करण्यास असमर्थ ठरतात. मानवाच्या पंचेंद्रियांना सध्या ज्ञात असलेल्या आयुधांद्वारे प्रयोगशाळेत त्या ज्ञानाची कसोटी करणे जोपर्यंत भौतिक शास्त्राला शक्य होत नाही, तोपर्यंत काही वैज्ञानिक, बुद्धिवादी लोक अशा ज्ञानाच्या अस्तित्वाबद्दल शंका, संशय व्यक्त करत राहतात व ते खोटे असल्याचे मोठ्या हिरीरीने सांगत राहतात. त्यांच्या प्रचारामुळे सामान्य लोक 'तरल किंवा दिव्य ज्ञान' नावाचे विशेष ज्ञान असूच शकत नाही असे परस्पर ठरवून त्या ज्ञानकडे पाठ फिरवून बसतात.

प्रत्येक मानवाला दिव्यज्ञान आकलन करून घेण्याची क्षमता असते. प्रत्येक बीजापासून वृक्ष बनण्याची संभावना असते पण म्हणून प्रत्येक बीजाचा विशाल वृक्ष बनतोच असे नाही. पैशाच्या माध्यामातून सर्व मानवी सुखे आपणाकडे खेचून त्यांचा भोग घेण्यासाठी धडपड करणा-यांची सध्या चलती आहे. त्यांना या आत्मसुखाच्या दिव्य ज्ञानाचा विसर पडणे साहजिक आहे. ज्यांची मनोधारणा नकारात्मक आहे, त्यांना असे अतिंद्रीय अनुभव घेणे हे त्यांनी ठरवलेल्या, प्रचारित केलेल्या विचारधारेशी बेइमानी होईल या भीतीपोटी अपमानचे वाटते म्हणून त्यांना या दिव्याज्ञानाचे अनुभव घेणे अशक्य आहे. अशा लोकांना आम्ही या अनुभव शास्त्राचा प्रत्यक्ष अनुभव घेणार नाही आणि घ्यायची गरजही नाही, ज्याना तसे अनुभव आलेत त्यांचे मत आम्ही मानणार नाही. थोतांड' म्हणून त्यावर शिक्का मात्र जरूर मारणार!' अशी आडमुठी भूमिका घेण्यातच त्यांना धन्यता वाटते.

मृतात्म्यांशी संचार लेखन किंवा ऑटो रायटिंग करुन संपर्क हा विषयही असाच मानवी यंत्रणेचा अजब अनुभव आहे. 'संचार' या शब्दामुळे वाचकांच्या समोर सिनेमात दाखवतात तशा मळवट भरलेल्या बायकांचा थयथयाट किंवा घागरी फुंकताना होणारा उन्माद वगैरे तसे काही नसते.


Comments

Popular Posts