अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या समाधीचे ठिकाणी आलेले स्वलेखन
अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या पादुकांसमोर झालेले स्वलेखन ऑटोरायटिंगचे अनुभव स्वलेखन म्हणजे काय? ते कसे करतात? ते कोण करते? वगैरे माहितीसाठी वरील लिंक उघडा. ऑटोरायटींगची सुरवात कशी दणक्यात झाली याची ही कहाणी! " भडव्या भुत बघायची घाई तुला. तिथ येशील तेंव्हा भेट मला. पोरगी म्हणाली म्हणून तू आला(स) पुन्हा येईन म्हणून गेला(स) गडबडीत... भेटायला येता मतीप्रकाश होईल.... कुत्र्याला पावाचा तुकडा दे. ... समर्थ..." समाधी समोरच्या लोखंडी सळ्यांच्या सोप्यात वरील ऑटोरायटींग घडले. त्याचा संदर्भ सांगणे गरजेचे आहे... त्याचे असे झाले... ... २५ फेब्रुवारी २०२१ रोजी गाडी करून आम्ही अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या समाधीचे दर्शन घ्यायला गेलो होतो. वाटेत तसेच पुढे जाऊन गाणगापूरला नृसिंह पादुकांचे दर्शन घ्यायला जायचे ठरवले होते. पराग (जावई), नेहा, व चिन्मय मुलांना तिथे अंगात आलेल्या व्यक्ती दिसतात असे बोललो होतो. म्हणून त्यांना तेही पहायला जायची सुरसुरी होती. ती संधी मिळेल असे वाटत होते. पण कर्नाटक राज्यातील कोरोनाच्या बिकट परिस्थितीमुळे राज्यात बंदी घातली होती म्हणून ...